ऑथेंटिक चिकन दालचाच्या फ्लेवर्सचा आस्वाद घ्या

दालचा राईस या खाद्य मेनूला काहीजण दालचा खाना आसे सुध्दा म्हणतात. तसे पाहिलेतर दालचा राईस हा संपुर्ण जेवणातील हे फार जिवनसत्वाने भरलेला आणि शरिराच्या आरोग्यासाठी वरदान आसलेला पदार्थ आहे. काही लोकांना दालचा विषयी फार माहिती नाही तो कसा बनतो त्यात कोणकोणते घटक टाकले जातात त्याचे शरिराला काय फायदे होतात यावर आपण येथे सर्व आणि थोडक्यात जाणुन घेऊ.

12/19/20231 min read

दालचा हा खाद्य पदार्थ बनवताना त्यात मसुर दाळ. तुर दाळ. हरभरा दाळ. चुका पालेभाजी. पालक पालेभाजी. कसुरी मेथी. दुधी भोपळा व काही निवडक गरम मसाले यांचा वापर करुन दालचा बनवला जातो. दालचा हा खाद्य मेनू बनवायला किमान 4 तासांचा वेळ लगतो. दालचा हा दाळ भात बनवल्यासारखा बनवता येत नाही ह्यामध्ये दोन प्रकारचा दालचा आसतो एक वेज आणि दुसरा चिकन दालचा तसे पाहिलेतर या दोन्ही दालचाची रेसिपी व मसाल्याचे प्रमाण वेग वेगळे आसते. दालचा बनवताना व्यवस्थितपणे काळजी घ्यावी लागते. आता पाहिलेतर काही आचारी यावर बलतात की मी तर 1 तसातच दोन्ही दालचा बनवतो. हे खरे आहे की काही आचारी लगेच दालचा बनवतआसतील लगेच परंतु आम्ही स्वच्छतेची काळजी घेत आणि ग्रहाकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच बनवतो. वेज आणि नाॅनवेज दालचा बनवताना दोन्ही वगवेगळे बनवतो दोघांची भांडी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये ह्याची जवाबदारीने काळजी घेतो. दालचा हा शरिरासाठी फार उपयुक्त आहे कारण या खाद्य मेनू मध्ये भरपुर प्रमाणात जिवनसत्वाचा खजिना भरलेला आहे. ते कसे आपण खालील प्रमाणे पाहु.

1) मसुर दाळ - मसुर दाळीमध्ये प्रोटिनचा भरपुर प्रमाणात साठा आसतो त्यामुळे मांसपेशी व हाडांना मजबुती मिळते. मसुर दाळ फायबरयुक्त आसल्यामुळे पचनक्रिया वेगवान करण्यास उपयोगी राहते तसेच मधुमेह आजार आसलेल्या लोकांसाठी फार लाभदायक आहे. मसुर दाळीत प्रीबायोटिक / कार्बोहाईड्रेट व डाइटरी फायबर आसल्यामुळे जाडेपणा. कैंसर. हृद्दयरोग व मधुमेह आसे आनेक आजारावर उपयुक्त पडते.

50 ग्रॅम दाळ खाललीतर त्यातुन खालिल प्रमाणे प्रोटिन मिळतात

उर्जा - 171.05 Kcal

प्रोटिन - 12.22 ग्रॅम

कार्बोहाइड्रेट - 02.22 मिली.ग्रॅम

फायबर - 05.00 मिलि.ग्रॅम

कैल्शियम - 22.00 मिलि ग्रॅम

आयरन - 03.00 मिलि.ग्रॅम

पोटोशियम - 333.05 मिलि.ग्रॅम

व्हिटामिन - 04.00 मिलि.ग्रॅम

2) तुर दाळ - तुर दाळी मध्ये कैल्शियम. फाॅस्फरस. मॅग्नेशियम खनिजे. पाॅटेशियम आसे जिवनसत्व आसल्यामुळे तुर दाळ ही शरिरास फार उपयुक्त आहे.

टिप - सध्याच्या जगात सर्वांचे धावपळीचे जिवन आहे. वळेवर झोप नसने. वेळेवर जेवण नसने. रात्रभर जागने. विविध प्रकारचे नशा करने. सतत डोक्यात विचार ठेवने या सर्व प्रकरामुळे शरिरावर परिणाम तर होतोच परंतु पोटाची पचनक्रिया बिघडुन पित्तासारखे आजार होण्याची शक्यता भासावते त्यामुळे आम्ही तुर दाळीचे प्रमाण योग्य प्रमाणेच वापर करतो. कारण तुर दाळ ही पित्तदोष वाढवण्यास मदत करते त्यामुळे संपुर्ण गोष्टीचा विचार करुनच फक्त चवीपुरती वापरली जाते.

हरभरा दाळ - हरभळा दाळी मध्ये सोडियम. पोटेशियम. फायबर. आयरन. कैल्शियम हे भरपुर प्रमाणात जिवनसत्व आसल्यामुळे मधुमेह. हाडे मजबुत होण्यासाठी.आशा आनेक आजारासाठी उपयुक्त आहे

टिप - गरभरा दाळ सुध्दा पित्तदोष वाढवण्यास मदत करते त्यामुळे या दाळीचे प्रमाण फार कमी घेतले जाते

चुका पालेभाजी - आंबट चुका ही पालेभाजी शरिरातील मलातील गाठी मोडणारी थंड. वेदनास्थापन. दिपक. शोधध्न या गुणाने गुणधर्म आहे. चुका ही भाजी हॄद्दयाच्या आजारावर छातीत दुखणे. बध्दकोष्ठता.प्लिहारोग. उचकी. उदयवायु ( पोटातील वायु गॅस ) दमा. श्वसनलिका मधील दाह. अपचन. वांती. मुळव्याध आशा आनेक आजारावर अत्यंत उपयुक्त पालेभाजी आसल्यामुळे खाण्यास उपयुक्त आहे.

पालक पालेभाजी - पालक ही पालेभजी सुपर फुड या नावाने ओळखली जाते. पालकामध्ये कैल्शियम. मॅग्नेशियम. लोह. विटामिन A आणि C आसल्यामुळे रोजच्या जेवणात नियमित वापर केलातर कर्करोगापासुन संरक्षण होण्यास मदत मिळते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवणे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे. व तसेच हाळु हाळु मधुमेह आजारावर पुर्ण नियंत्रण ठेवण्यास फार मोठी मदत होते.

टिप - ज्यांना संधीवात सारखा आजार आहे व जे लोक रक्त पातळ करण्यासंबधी ओषधे घेतात त्यांनी पालक पालेभाजीचा वापर फार कमी करावा याचा आम्ही सुध्दा विचार करुनच पालक भाजीचा वापर योग्य प्रमाणातच केला जातो.

कसुरी मेथी - कसुरी मेथी ही मेथी पालेभाजीचे जे वरील कोवळे पाने आसतात ते पाने वाळवुन कसुरी मेथी तयार केलेली आसते. काही लोकांना कसुरी मेथीचे कोणते औषधी गुणधर्म आहेत त्याचे म्हत्व माहितच नाही. जेवणाला फक्त चांगली चव यावी यासाठीच वापर केला जातो. कसुरी मेथी ही थोडी कडवट चवीची आसते. कसुरी मेथीच्या आर्कमधील फ्लेवोनोइडम मध्ये हाइपोकाॅलेस्टेरोलेमिक आणि एंटीआॅक्सीडेंट हे गुणधर्म आसतात ज्यामुळे HDL ( खराब कोलेस्ट्रोल ) कमी करण्यास मदत करते. मधुमेह. स्तनपानासाठी. हृद्दयासाठी उपयोगी. आताड्यातील दोष निवारण. एनिमिया. त्वचा. केस आसा भरपुर प्रमाणात शरिरास उपयुक्त कसुरी मेथीचा फयदा होतो.

दुधी भोपळा - दुधी भोपळा हे शरिरासाठी अत्यंता फायदेशीर फळ भाजी म्हणुन ओळखली जाते. दुधी भोपळ्यामध्ये लोह. कॅल्शियम. फाॅस्फरस. विटामिन B. प्रथिने.खनिजे.आद्ररता. तंतुमय व पिष्टामय पदार्थ हे सर्व पोषक उपल्ब्ध आसतात. आर्युवेदानुसार दुधी भोपळा हा पित्तनाशक. कफनाशक. हॄद्दय. मुत्रल व सो्तधातुंचे पोषण करणारा बलधारक आहे. दुधी भोपळा कमी उष्णांक आसल्यामुळे हॄद्दयासाठी वरदान आहे. त्यामुळे दुधी भोपळा नेहमी जेवणाच्या आहारात आसावाच.

कोलम राईस - कोलम राईस मध्ये वाडा / जिरा राईस व जोकर राईस उत्तम राईस मानला जातो. हा कोलम राईस बारिक व स्टार्च जिवनसत्वे प्रथिने कार्बोहायड्रेटस आणि इतर आहारातील सामुग्रीने समृध्द आहे. जो शिजवल्यानतर नरम मऊ होतो व पचायला सुध्दा हालका जातो

चौधरी परिवाराकडुन नेहमी आपल्या ग्रहाकांच्या आरोग्यची काळजी घेतली जाते. आमचा फक्त पैसा कमवण्याचा उद्देश नाही तर आम्ही जे जेवण देतो ते शरिराला किती पोषक व फायदेशीर होईन याचा पुर्ण आभ्यास करतो. आमचे ग्राहक म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य प्रमाणे आहेत. आणि शेवठपर्यंत आम्ही आपली आशीच सेवा करत रहणार यात शंका नाही.